धाकोरा येथे जोरदार रंगला 'खेळ पैठणीचा'

कोकणसाद LIVE, माईलस्टोनचे आयोजन ; सरिता मुळीक ठरल्या पैठणीच्या मानकरी
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 06, 2022 16:23 PM
views 212  views

सावंतवाडी : कोकणचे नंबर वन महाचॅनेल कोकणसाद LIVE,  कोकणचे प्रथम दैनिक कोकणसाद व माईलस्टोन प्रायोजित 'खेळ पैठणीचा' हा महिलांसाठीचा विशेष कार्यक्रम धाकोरा येथील श्री देवी पावणाई मंदिरात बुधवारी चांगलाच रंगला.

पंचायत समितीच्या माजी सदस्य मनीषा गोवेकर तसेच धाकोरा ग्रामस्थ व नवरात्रौत्सव मित्र मंडळाच्या सहकार्याने रंगलेल्या या कार्यक्रमात तब्बल ६० महिलांनी सहभागी होत खेळ पैठणीच्या कार्यक्रमात रंगत आणली.

मात्र यात पैठणीच्या मानकरी ज्येष्ठ महिला सरिता बाळकृष्ण मुळीक ठरल्या, तर द्वितीय पारितोषिकाच्या मानकरीउर्वी उमेश मुळीक ठरल्या. उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी अनुक्रमे संजना संजय मुळीक, शुभांगी बाबुराव मुळीक व गौरी गणेश मुळीक ठरल्या आहेत. या 

अत्यंत दिमाखदार व रंगतदार कार्यक्रमात धाकोरा पंचक्रोशीतील महिलांनी उत्स्फूर्त सहभागी होऊन उदंड प्रतिसाद दिला व कोकणसाद LIVE चे मनापासून आभार मानले. तसेच दरवर्षी हा कार्यक्रम आपल्या गावात घेण्याची विनंती देखील आयोजकांना केली.

प्रारंभी पंचायत समिती माजी सदस्य मनीषा गोवेकर  यांच्या हस्ते माता दुर्गादेवीच्या चरणी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मुख्य प्रयोजक माईलस्टोनचे योगेश नायर, बबलू सावंत, अमोल लाड, मेघा राणे,  नितीन मुळीक, निलेश मुळीक, बंड्या मुळीक, स्नेहा मुळीक, प्रज्वल मुळीक अंकुश मुळीक, बबीता गोवेकर, दिव्या गोवेकर, चंद्राराणी कोठावळे, गवस, तोरस्कर, दिपाली मुळीक, संध्या मुळीक, भारती मुळीक आदी उपस्थित होते.


प्रत्येक फेरीत रंगला खेळ :

'खेळ पैठणीचा' या कार्यक्रमात एकूण पाच फेऱ्या घेण्यात आल्या. या प्रत्येक फेरीत महिलांची उत्कंठा वाढतच होती. प्रत्येक फेरी दरम्यान महिलांची बौद्धिक, मानसिक कसोटी लागत होती आणि बहारदार सूत्रसंचालक प्रा. रुपेश पाटील महिलांना मनोरंजक पद्धतीने खेळ  खेळवत मनोरंजन व प्रबोधनात्मक संदेशही देत होते हे विशेष.

 दरम्यान अंतिम फेरीत उर्वी मुळीक, गौरी मुळीक, शुभांगी मुळीक, संजना मुळीक व सरिता मुळीक या स्पर्धक पोहोचल्या. मात्र यात सर्वात अव्वल ठरल्या त्या सरिता मुळीक.

 त्याच पैठणीच्या मानकरीही ठरल्या, तर दुसऱ्या क्रमांकावर उर्वी मुळीक यांनी बाजी मारत साडी हे बक्षीस जिंकले.

 त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पैठणी विजेत्या सरिता मुळीक यांना पैठणी बक्षिस देण्यात आली. व पाचही विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. मनीषा गोवेकर यांनी  तीन पारितोषिके पुरस्कृत केले होते.

कोकणसाद खरोखरचं जनमाणसांच्या मनातील चॅनेल - मनीषा गोवेकर

यावेळी उपस्थित असलेल्या पंचायत समितीच्या माजी सदस्य मनीषा गोवेकर म्हणाल्या की, आज अनेक चॅनेल व वृत्तपत्र पत्रकारिता करतात. परंतु कोकणसाद लाईव्ह हे चॅनेल धाकोरासारख्या ग्रामीण भागात येऊन महिलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि त्यांच्या सांस्कृतिक व बौद्धिक विकासासाठी 'खेळ पैठणीचा' अशा सारख्या कार्यक्रमांचे आयोजन करते, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. खऱ्या अर्थाने कोकणसाद हे जनमानसांच्या मनातील चॅनेल आहे. असे म्हणत गोवेकर यांनी कोकणसादचे मनःपूर्वक आभार मानले व यापुढेही धाकोरा व आजगाव पंचक्रोशीत विविध कार्यक्रम घेण्यासाठी विनंती केली.

 यावेळी मुख्य प्रायोजक माईलस्टोन कंपनीचे योगेश नायर, बबलू सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले.

पैठणी विजेत्या सरिता मुळीक यांना अश्रू अनावर

धाकोरा येथे संपन्न झालेल्या 'खेळ पैठणीचा' या कार्यक्रमातील सहभागी असलेल्या सर्वात ज्येष्ठ महिला सरिता बाळकृष्ण मुळीक यांनी पहिल्या फेरीपासूनच आपल्या एकूण व्यक्तिमत्त्वाची छाप सोडली. प्रत्येक फेरी दरम्यान त्यांनी आघाडी घेत पैठणी जिंकली. पैठणीचा निकाल जाहीर झाल्याबरोबर निवेदक प्रा. रुपेश पाटील यांनी त्यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले असता सरिता मुळीक यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या या भावुक व संवेदनशील मनाचा उपस्थितांनी आदर राखत टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.

प्रा. पाटील भावोजींची कमाल,

गाणी, उखाण्यांसह विनोदांची धमाल

दरम्यान, आपल्या बहारदार सूत्रसंचालन आणि संपूर्ण कार्यक्रमात रंग भरले ते कोकणसादचे उपसंपादक प्रा. रुपेश पाटील यांनी. प्रत्येक फेरी दरम्यान प्रा. पाटील यांनी ग्रामीण भागातील सहभागी असलेल्या प्रत्येक महिलेला आपल्या ओघवत्या शैलीने बोलके केले.

स्पर्धेत सहभागी महिलांनी लाजत व मितभाषी होत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन घडविले स्वतः निवेदक पाटील यांनी विविध उखाणे सादर करत उपस्थितांची मने जिंकली.