
वेंगुर्ले : शिवसेना वेंगुर्ला महिला आघाडी यांच्या वतीने येथील नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या "जागर स्त्री शक्तीचा, खेळ पैठणीचा" कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत तुळस गावातील निधी नारायण कोचरेकर पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर द्वितीय क्रमांक प्राप्त संजीवनी राणे (वडखोल) यांना नथ व तृतीय क्रमांक प्राप्त साक्षी परब (परबवाडा) यांना गळ्यातील ठुशी देऊन गौरविण्यात आले. यावेळी तालुक्यातील विविध भागातील महिलांनी या स्पर्धेत सहभागी होत धमाल मजा मस्ती केली. सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तर यावेळी आयोजित लकी ड्रॉ द्वारे महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे उदघाटन इयत्ता १० विच्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या अर्पिता सामंत हिच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, विकास योजना समन्वयक सुरज परब, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, महिला तालुकाप्रमुख दिशा शेटकर, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, महिला उपजिल्हाप्रमुख शीतल साळगावकर, महिला शहरप्रमुख ऍड श्रद्धा परब-बाविस्कर, रेडी जि प महिला विभागप्रमुख हर्षा परब, म्हापण विभाग प्रमुख देवदत्त साळगावकर, महिला शहर संघटिका मनाली परब, अल्पसंख्याक सेल संघटिका शबाना शेख, उभादांडा महिला विभागप्रमुख सावली आडारकर, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, शहरप्रमुख संतोष परब, तालुका सचिव सागर गावडे, सी एम वॉर रूमचे नीरज पंचोली, उमेश आरोलकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे समालोचन प्रसिध्द समालोचक मयूर चराटकर यांनी केले.