रोटरी क्लब खेडचा अध्यक्षपद स्थापना सोहळा उत्साहात

Edited by: मनोज पवार
Published on: June 30, 2025 12:59 PM
views 139  views

खेड : रोटरी क्लब खेडचा 2025 - 26 या वर्षासाठीचा नवा अध्यक्ष व संचालक मंडळाचा स्थापना सोहळा रविवारी, २९ जून रोजी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, खेड येथे उत्साहात संपन्न झाला. या वर्षी रोटेरियन मंदर गोपिनाथ संसारे यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. त्यांच्यासह नवीन संचालक मंडळाची स्थापना करण्यात आली. हा सोहळा जिल्हा सचिव रोटेरियन दुर्गेश हरिटे यांच्या हस्ते पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुरज जी. बंडसोदे (एचपीसीएल, सीनियर मॅनेजर - एचआर आणि वर्किंग प्रेसिडेंट, ऑल इंडिया HPSEWA) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी रोटेरियन डॉ. उपेंद्र तळाठी (एजी डिस्ट. 3170) आणि रोटेरियन बिपीनदादा पाटणे (चार्टर अध्यक्ष, रोटरी क्लब खेड) हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन रोटेरियन आदित्य गांधी (अध्यक्ष 2024-25) आणि रोटेरियन डॉ. रियाज मुल्ला (सचिव 2024-25) यांनी केले होते. सोहळ्यानंतर उपस्थित सर्व पाहुण्यांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती. रोटरी क्लब खेडचा हा 25 वा वर्षपूर्तीचा सोहळा असल्याने कार्यक्रम अधिकच विशेष आणि स्मरणीय ठरला.