सावंतवाडीत डिसेंबर एंडला खाऊ गल्ली महोत्सव

रोटरी क्लब, दीपकभाई मित्रमंडळाचा पुढाकार
Edited by: विनायक गावास
Published on: December 27, 2022 23:02 PM
views 1023  views

सावंतवाडी: मनोरंजनानंतर खवय्यांंनी चमचमीत पदार्थांची मेजवानी घेऊन येत आहे रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी. रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आयोजित व दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत ''खाऊ गल्ली'' महोत्सव येत्या ३० व ३१ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे हा महोत्सव होणार आहे. यावेळी खवय्यांंनी चमचमीत पदार्थांवर ताव मारण्यासाठी खाऊ गल्ली महोत्सवात उपस्थित राहत खमंग, रूचकर अन् चटकदार पदार्थांची चव चाखावी असं आवाहन रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी, दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांच्याकडून करण्यात आल आहे.