चिपळूूण : मुंंबईहून गणेशभक्तांना गणेशोत्सवासाठी कोकणात येण्यासाठी विनामूल्य बसेस व्यवस्था काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती यां 50 बसेसचे व्यवस्थापन सेवाभावी संस्था कोकण कट्टाने केले होते. दिपेश सावंत, विजय बाईत, दयानंद मांडवकर, सचिन दिवाळे, ओंकार कदम, विलास सावंत,सिद्ध्यू सावंत, जयवंत जोशी, संतोष जाधव, दशरथ पांचाळ यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. 2000 पेक्षा अधिक गणेशभक्त या सुविधेद्वारे कोकणात सुखरूप आले. यावेळी कोकणातील प्रसिद्ध मसाले उद्योजक शालिग्राम खातू यांनी सर्व प्रवाशी आणि एस.टी. कर्मचारी यांना भेटवस्तू म्हणून कापडी पिशवी , मसाला पॅकेट, रेसिपी बुक, आरती पुस्तक आणि खेळण्यासाठी पत्यांचा संच दिला. प्रवासा नंतर अनेक भक्तांनी घरी पोहचतात कोकण कट्टा सदस्यांना संपर्क साधून आभार मानले. संजयजी उपाध्याय यांच्या सहकार्यामुळेच हा भव्य उपक्रम यशस्वी झाला. बस जेथून सोडल्या त्या ठिकाणच्या स्थानिक रहिवासी , तसेच मार्बल सिरॅमिक व्यापारी, विलेपार्ले पोलिसां, मनपा के वार्ड, वाकोला वाहतूक पोलिस आदींनी उपक्रमासाठी सहकार्य केले.