
सावंतवाडी: माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी पालकमंत्री नितेश राणेंची भेट घेतली. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी आदी उपस्थित होते. यावेळी त्यांच्या युतीबाबत चर्चा झाली.
याबाबत विचारले असता श्री. केसरकर म्हणाले, आज पालकमंत्री नितेश राणे यांनी भाजपातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. ते आपल्या वरिष्ठांना त्यांचा अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर युतीचा फायनल निर्णय वरिष्ठ घेणार आहेत. मी युतीसाठी पॉझिटिव्ह असून लवकरच हा निर्णय जाहीर होईल अशी माहिती दिली.











