केसरकर ठाकरेंवर काय बोलणार ?

सावंतवाडीत आज राणे-केसरकरांची जाहीर सभा
Edited by: विनायक गावस
Published on: May 05, 2024 06:22 AM
views 251  views

सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आज सावंतवाडीत जाहीर सभेच आयोजन करण्यात आले आहे. गांधी चौक येथे ही सभा होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह महायुतीचे उमेदवार या सभेला उपस्थित रहाणार आहेत.  दुपारी दोन वाजता ही सभा सुरू होणार असून महायुतीकडून माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी उपस्थित रहाण्याच आवाहन केलं आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या सावंतवाडीतील सभेनंतर महायुतीच्या सभेकडे राजकीय वर्तुळाच लक्ष लागून राहीलं आहे.  केसरकर यांच्या होम ग्राउंडवर होणाऱ्या सभेत ते काय बोलणार ? जनतेला काय आवाहन करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.