
सावंतवाडी : दीपक केसरकर मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावे व पुन्हा एकदा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व्हावेत असा नवस आम्ही बालाजीला केला आहे. त्यांच्या विजयानंतर कोल्हापूरातून मंत्री केसरकर हत्तीवरून मिरवणूक काढणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी केले आहे
ते म्हणाले, दीपक केसरकर यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही आलो आहोत. ७० हजार शिक्षकांना अनुदान देण्याचे काम श्री. केसरकर यांनी केलं आहे. ते मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावे व पुन्हा एकदा तुम्ही शिक्षणमंत्री व्हावे यासाठी बालाजीला नवस केला आहे. बिरोबाची मानाची काठी अन् घोंगडं सोबत घेऊन आलोय असे महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले. विजयानंतर कोल्हापूरातून मंत्री केसरकर यांची हत्तीवरून मिरवणूक काढणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.