केसरकरांनी विठ्ठल पंचायतन देवस्थानातील देवतांचे घेतले आशिर्वाद

Edited by:
Published on: November 18, 2024 14:09 PM
views 150  views

वेंगुर्ले : सावंतवाडी विधानसभा निवडणुकीतील भाजपा-सेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अभ्यासू व अनुभवी असलेले अन मतदार संघासह जिल्ह्यात अनेक विकास कामे केलेले उमेदवार दिपक केसरकर यांनी खानोली-वायंगणी येथील विठ्ठल पंचायतनातील विठ्ठल-रखुमाई बरोबर दत्त महाराजांचे दर्शन घेतले. या देवस्थानचे व्यवस्थापक दादा पंडित महाराज यांचा आशिर्वाद ही यावेळी त्यांनी घेतला.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे पहिल्या पासून अध्यात्मिक व धार्मिकता जपणारे आहेत. देवतेची पुजापाठ केल्यानंतरच त्यांच्या दिवसाची सुरवात होते. राजकारणात राहून मोठ्या प्रमाणात समाजकारण करत धार्मिकता जोपासणाऱ्या दिपक केसरकर यांनी या मतदार संघासह जिल्ह्यातील तसेच देशातील प्रसिद्ध देवतेंचे दर्शन खास वेळ काढून घेतलेले आहे. आणि महिला तसेच जेष्ठांना मोफत देवदर्शनही घडविलेले आहे. साईभक्त म्हणून त्यांना ओळखले जाते. 

शनिवारी कार्तिक प्रतिपदेचे औचित्य साधून वायंगणी-सुरंगपाणी येथील विठ्ठल पंचायतन येथे भेट देवून त्यांनी विठ्ठल-रखुमाई, व्यासमुनी व दत्तमंदिरातील दत्तमहाराज, शेगाव चे गजानन महाराज व श्री साईनाथ यांचे दर्शन घेतले. यावेळी विठ्ठल पंचायतनचे व्यवस्थापक ह.भ.प. दादा पंडित महाराज यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत करीत त्यांना यशस्वी भव आशिर्वादही दिले.