
सावंतवाडी : मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलबाबत राजघराण्याने मांडलेल्या भूमिकेनंतर तरी दीपक केसरकर यांनी आता दिखाऊपणा करणे कमी करावे व अन्य ठिकाणी रुग्णालय हलवण्यासाठी पावलं उचलावे. आम्ही विनामोबदला महामार्गलगत असलेल्या वेत्ये गावात जागा उपलब्ध करून देण्यासाठी तयार आहोत असे मत सरपंच गुणाजी गावडे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, केसरकर यांच्यासाठी रुग्णालय महत्वाचा नसल तरी सर्वसामान्य गरीब जनतेसाठी खूप महत्त्वाच आहे. आरोग्य विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे अनेक जणांचे गेले सात वर्षे जीवन संपले. ती कुटुंब उध्वस्त झाली आहे. तरी यापुढे केसरकारांनी स्वतःच्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा विचार करत निर्णय घ्यावा असे आव्हान श्री गावडे यांनी केले.