LIVE UPDATES

आरोग्य पर्यटनासाठी केसरकरांनी वेधलं आरोग्यमंत्र्यांचे लक्ष

Edited by: विनायक गांवस
Published on: June 10, 2026 20:58 PM
views 25  views

सावंतवाडी : राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतर्गत सिंधुदुर्ग जिल्हातील प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा व आंबोली येथे आयुष वेलनेस क्लिनीक तसेच रेडी- वेंगुर्ला येथे विशेष आयुष केंद्र स्थापन करण्याकरीता मंजुरी देऊन निधी उपलब्ध करुन देण्याबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी लक्ष वेधले. तसेच मतदारसंघातील आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व इतर पदे भरण्यासंदर्भात आग्रही मागणी केली.

राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पर्यटनाचा विचार करता भारतीय उपचार पद्धती या आयुर्वेद, पंचकर्म, योग नॅचरोपॅथी याविषयी विदेशी पर्यटकांना आकर्षण आहे. आयुष मंत्रालयामार्फत वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात येते आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी हे महाराष्ट्र गोवाच्या सीमेवर वसलेले असून येथे येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचप्रमाणे आचरा हे समुद्रकिनारी वसलेले आहे व आंबोली हे वर्षा पर्यटनस्थळ असून पर्यटकांचे आकर्षण आहे.

आयुष मंत्रालयाने सादर केलेल्या वार्षिक अर्थसंकल्पात वैद्यकिय पर्यटनामध्ये आयुष सेवांना अंतर्भूत करण्याबाबत अधोरेखित केलेले आहे. त्या अनुषंगानेपरोक्त संदर्भान्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा व आआंबोली येथे 'स्वास्थ्य केंद्र' सुरु केल्यास वैद्यकिय पर्यटनाविषयी जनजागृती होईल व भारतीय तसेच परदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल, तरी या कामास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आम. केसरकर यांनी केली.