
दोडामार्ग : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर हेतूपरस्पर बदनामीकारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्याची तात्काळ चौकशी करून गुन्हा दाखल करावा असे निवेदन येथील दोडामार्ग पोलिसांना शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांनी दिले आहे.
दीपक केसरकर यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर कोणी विरोधकाने शोषल मीडियावर बदनाम कारक व्हिडीओ व्हायरल करून समाजात बदनामी केली आहे त्याची तात्काळ चौकशी करून गुन्हा दाखल करावी अशी मागणी निवेदनाद्वारे तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस यांनी केली आहे. यावेळी त्यांच्या सोबत मणेरी विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, सोशल मीडिया तालुका प्रमुख गोपाळ गवस, शाखा प्रमुख लाडू आयनोडकर आदी उपस्तीत होते .