
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात शिंदे गटाचे किती सरपंच व सदस्य आलेत ? तुमची किती पॅंनल उभी राहिली, हे मंत्री केसरकर यांनी जाहीर करावं, असं आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिलं. फक्त दोन सरपंच शिंदे गटाचे निवडून आलेत. खासदार विनायक राऊत लोकांप्रती काम करत आहेत. जनता त्यांच्या कामाची पद्धत जाणते. दीपक केसरकर दोन सरपंच सांभाळू शकत नाहीत. पराभव झाल्यानं अशी टिका करायची वेळ त्यांच्यावर आलीय. ५२ पैकी १५ पॅंनल त्यांना उभी करता आलीय. तर ४०-४५ सदस्यांची डिपॉझीट जप्त झालीत. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भरघोस यश तालुक्यात प्राप्त केलं आहे. जनतेन नाकारल्यामुळे बेताल वक्तव्य ते करत आहेत. परंतु, खासदार विनायक राऊत २०२४ सुद्धा भरघोस मतांनी विजयी होतील असा विश्वास रूपेश राऊळ यांनी व्यक्त केला.
जनतेन त्यांना जागा दाखवेली आहे. केसरकर यांनी केलेला विकास जनतेला ठावूक आहे. म्हणूनच मोठ्या पराभवाला त्यांना सामोरं जावं लागल. आमदारकीचा पराभव दिसत असल्यानं केसरकर खासदारांबाबत विधान करत आहेत असा पलटवार केला. यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, उप जिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, वेंगुर्ला तालुका प्रमुख बाळू परब, सुनिल गावडे, आबा सावंत आदि उपस्थित होते.