
दोडामार्ग : तालुक्यातील केर - भेकुर्ली ही ग्रामपंचायत नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम घेण्यासाठी प्रसिद्ध आहे यात भर म्हणून या ग्रामपंचायतने १२ ऑगस्टला कलम बांधणी कार्यशाळा आयोजित केली आहे यावेळी विशेष म्हणजे जे आंबे कोकणात रायत्यासाठी वापरले जातात ती झाडे आता जीर्ण होत चालली असून काही जाती नामशेष होत आहेत त्यामुळे या जाती टिकून राहाव्यात यासाठी गावठी आंबे कलम बांधणी प्रायोगिक होणार आहे.
रायत्याच्या आंब्याची कलमे तज्ज्ञ व्यक्तीकडून बांधणी कार्यक्रम करायचा आहे जेणेकरून आपली पारंपारिक जात टिकेल साधारण चार वर्षात फळही मिळेल. यासाठी कृषि अभ्यासक चंद्रशेखर सावंत, रोपवाटीका अभ्यासक सुनील देसाई, कलम बांधणी तज्ज्ञ महेंद्र सहदेव मोरजकर हे उपस्थित राहणार आहेत. ग्रामपंचायत कार्यालय केर भेकुर्ली येथे सकाळी ११ वा. होणार असल्याची माहिती सरपंच- रुक्मिणी मुकुंद नाईक, उपसरपंच - तेजस तुकाराम देसाई, ग्रामपंचायत सदस्य - मेघना महादेव देसाई, गायत्री गणपत देसाई, यशवंत राजाराम देसाई, लक्ष्मण नाऊ घारे, प्रियंका मंगेश देसाई, लक्ष्मी नारायण धुरी, ग्रामसेवक संदीप पाटील यांनी दिली.