सावंतवाडी तालुका महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कीर्ती बोंद्रे !

उपाध्यक्षपदी माधुरी वाडकर यांची निवड
Edited by: रुपेश पाटील
Published on: January 06, 2023 17:45 PM
views 262  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका महिला नागरी सहकारी पतसंस्थेची सन २०२२-२३ ते २०२६-२७ पंचवार्षिक निवडणूक दि. १ डिसेंबर २०२२ बिनविरोध झाली होती. या संस्थेच्या अध्यक्षपदी माजी नगरसेविका कीर्ती किशोर बोंद्रे यांची तर उपाध्यक्षपदी माजी नगरसेविका माधुरी गोविंद वाडकर यांची निवड करण्यात आली. निवड प्रक्रिया संस्थेच्या कार्यालयात गुरुवार दि. ५ जानेवारी २०२३ रोजी झाली. अध्यक्षपदासाठी कीर्ती बोंद्रे यांचे नाव छाया देशपांडे यांनी सूचविले तर सपना विरनोडकर यांनी अनुमोदन दिले.

उपाध्यक्षपदासाठी माधुरी गोविंद वाडकर यांचे नाव सपना तुळसकर यांनी सूचविले तर रेखा भुरे यांनी अनुमोदन दिले. निवडणुकीनंतर पतसंस्थेची आतापर्यंतची वाटचाल कौतुकास्पद असल्याचे सांगून यापुढे संस्थेच्या ठेवीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी श्वेता प्रशांत शिरोडकर, सपना देवेंद्र तुळसकर, देवता हेमंत मुंज, सपना संदीप विरनोडकर, क्षिप्रा प्रमोद सावंत, छाया नरेंद्र देशपांडे, सानिका चंद्रकांत शिरोडकर, रेखा सूर्यकांत भुरे, संस्थेच्या व्यवस्थापिका वृंदावनी वर्णेकर, कर्मचारी सुनंदा नाईक व दीपाली सावंत या उपस्थित होत्या. नागरी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. आर. आरोवंदेकर यांनी काम पाहिले.