करुळ इथं 'सरपंच दिव्यांगांच्या दारी' | सरपंच नरेंद्र कोलते यांनी राबविला स्तुत्य उपक्रम

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 25, 2023 16:47 PM
views 163  views

वैभववाडी : तालुक्यातील करुळ गावात "सरपंच दिव्यांगांच्या घरी"हा गावचे सरपंच नरेंद्र कोलते यांनी उपक्रम राबविला.आरोग्य यंत्रणा सोबत घेऊन गावातील दिव्यांग बांधवांची आरोग्य तपासणी केली.तसेच शासनाच्या विविध योजनाबाबत त्यांना माहीती दिली. 

पावसाळी हंगामात अनेक साथीचे आजार उद्भवतात.या आजारांवर  उपचार करण्यासाठी दिव्यांग बांधवांना दवाखान्यात नेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.यावर्षी  गावात सरपंच कोलते यांनी थेट दिव्यांगांच्या घरी आरोग्य यंत्रणा नेऊन त्यांची तपासणी केली.गावातील २१ पैकी १६ दिव्यांग बांधवांची घरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली.त्यांना वैद्यकीय अधिकारी यांनी औषधोपचार केले. 

या उपक्रमात वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. महेंद्रकर ,आरोग्य सेवक एस. एस. लोखंडे, सामुदाय आरोग्य अधिकारी ए..एम. चोचे, आरोग्य सेविका एस.एस. चाफे, ग्रा.पं. सदस्य विलास गुरव, रेखा सरफरे, माधवी राऊत, ग्रामसेवक शशिकांत गुरव, जगदिश पांचाळ, जान्हवी पांचाळ, प्रकाश सावंत, उदय कदम व ग्रामस्थ सहभागी झाले होते. या उपक्रमाबद्दल दिव्यांग बांधव व नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.

शासनाच्या विविध योजना दिव्यांग बांधवांना मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार तसेच सर्दी, ताप व साथीच्या आजाराकडे दुर्लक्ष न करता दिव्यांग बांधव व नातेवाईकांनी तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. असे आवाहन यावेळी सरपंच नरेंद्र कोलते यांनी केले.  करुळ गावच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.