
सिंधुदुर्गनगरी : तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर महामार्गावरील करुळ घाटात दरड कोसळल्याने ह्या घाट मार्गावरील वाहतूक १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत बंद करण्यात आलेली होती. दरड कोसळल्याने बाधित झालेल्या भागातील तसेच इतर संभाव्य धोका निर्माण करू शकणाऱ्या ठिकाणांवर संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दुरुस्तीचे काम तज्ञ पथकामार्फत पूर्ण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत करुळ घाट मार्ग वाहतुकीस योग्य स्थितीत असून, १३ सप्टेंबर २०२५ पासून राष्ट्रीय महामार्ग के १६६ जी तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर घाटमार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पुन्हा सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी निर्गमित केले आहेत.
रत्नागिरी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांनी मोटार वाहन कायदा १९८८ नुसार वाहतुकीसाठी सुरु करण्यात आलेला रस्ता लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी दिशादर्शक फलक, वाहतूक संकेत चिन्हे लोकांना समजेल अशा भाषेत लावण्याची किंवा उभारण्याची कार्यवाही करावी असेही या आदेशात नमूद आहे










