माडखोल - धवडकी शाळेच्या कार्तिकी वर्दमची नागपूर आकाशवाणीवर सिंधुदुर्गातून निवड

'शाळेबाहेरची शाळा' उपक्रमातंंर्गत एपिसोड ३० मेला होणार प्रदर्शित
Edited by: जुईली पांगम
Published on: May 22, 2023 20:07 PM
views 124  views

सावंतवाडी : प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन मुंबई यांच्या शाळेबाहेरची शाळा या उपक्रमाअंतर्गत सुरु असलेल्या 'फोन इन' कार्यक्रमात आयएसओ मानांकित माडखोल नं.२, धवडकी या शाळेची विद्यार्थीनी कु. कार्तिकी सुनिल वर्दम हिची नागपूर आकाशवाणीवर एपिसोड नं. ४६२ साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड झाली आहे.

या कार्यक्रमात कार्तिकी भारतीय संसद कायदे कसे तयार करते ? या विषयावर बोलणार आहे. हा एपिसोड ३० मे ला सकाळी ११ वा. नागपूर आकाशवाणी वरून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

कार्तिकीच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका भावना गावडे व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय राऊत, केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर सर्व शालेय कमिट्या, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले आहे. आकाशवाणीवर निवड होणारी ही शाळेची सहावी विद्यार्थीनी आहे. शाळेचे उपक्रमशिल शिक्षक अरविंद सरनोबत यांनी कार्तिकीला मार्गदर्शन केले.