तारामुंबरी श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशी उत्सवाचे आयोजन !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 22, 2023 11:18 AM
views 67  views

देवगड : तारामुंबरी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात २३ नोव्हेंबर २०२३ रोजी कार्तिकी एकादशी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. 

यानिमित्त पहाटे ४:३० वाजता श्रींची शोडशोपचार महापूजा पहाटे ५ ते ६ वाजता काकड आरती, सायंकाळी ४. ते ६.३० वाजता” गजर कीर्तनाचा आनंद सोहळ्याचा “सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार सौ. आरती सुनील बापट यांचे कीर्तन सायंकाळी ७ वाजता सांज आरती, ७.३० ते ८ वा ढोल वादन, याचं ८ वाजता दीपोत्सव या सर्व कार्यक्रमाचा व देव दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष, मानकरी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर तारामुंबरी ता.देवगड यांनी केले आहे.