LIVE UPDATES

बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 06, 2026 21:40 PM
views 53  views

कणकवली : बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,जानवलीमधील विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) मध्ये विद्यालयाचा विद्यार्थी कौस्तुभ शैलेश राणे याने जिल्हास्तरीय ग्रामीण सर्वसाधारण गटात 34 वा तसेच तालुकास्तरीय ग्रामीण सर्वसाधारण गटात 8 वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.

तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) मध्ये विद्यालयाचा विद्यार्थी मंथन मनोज सावंत याने जिल्हास्तरीय ग्रामीण सर्वसाधारण गटात 2 रा तसेच तालुकास्तरीय ग्रामीण सर्वसाधारण गटात 2 रा क्रमांक पटकावत दैदिप्यमान यश मिळविले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या सचिव सुलेखा राणे , खजिनदार रमेश राणे, शैक्षणिक समन्वयक प्रणाली सावंत , मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.