कणकवलीच्या सर्वांगीण, शाश्वत विकासाचे लक्ष्य : संदेश पारकर

ट्रॉफिक, बांधकाम समस्यांंबाबत संंबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 06, 2026 19:59 PM
views 30  views

कणकवली : कणकवली शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे.   केंद्र, राज्य व नगरपंचायतीच्या माध्यमातून सर्वांगीण आणि शाश्वत विकास केला जाणार आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून कणकवली स्वच्छ राहण्यासाठी सक्शन व्हॅन व शववाहिका उपलब्ध झाली आहे. सक्शन व्हॅनद्वारे शहरातील स्वच्छतेला हातभार लागणार आहे. मृत व्यक्तीचे शव ठेवण्यासाठी शववाहिनी उपयुक्त ठरणार आहे. शहरातील ट्रॉफिक समस्या व महामार्गाच्या चौपदीकरणा अंतर्गत अपूर्ण असलेल्या कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना करण्यात आल्याची माहिती, नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली. 

नगरपंचायतीच्या दालनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. पारकर बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, संकेत नाईक, जयेश धुमाळे, सत्यजित उर्फ बाळू पारकर, लुकेश कांबळे, सुमेधा अंधारी, दीपिका जाधव, जाई मुरकर आदी उपस्थित होते.  पारकर म्हणाले, कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करीत आहोत. केंद्र व राज्य सरकार आणि नगरपंयातीच्या माध्यमातून शहरातील प्रलंबित विकासकामे व  नव्याने करायची कामे पूर्णत्वास नेण्यात येत आहेत. स्वच्छ व सुंदर कणकवली राहण्यासाठी न. पं. चे स्वच्छता विभाग विविध उपाययोजना करीत आहेत. शासनाने नगरपंयातीसाठी सक्शन व्हॅन व शववाहिका उपलब्ध करून दिली आहे. याबद्दल मी राज्य शासनाचे आभार मानतो. यापुढील काळात केंद्र व राज्य सरकार योजनांमधून नगरपंचायत क्षेत्रात विविध विकासकामे केली जाणार आहेत. शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या सार्वजनिक समस्या सोडविण्यावर आमचा भर आहे. यापुढील काळात शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून नगराध्यक्ष म्हणून कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणणार आहे, असे पारकर यांनी सांगितले. 

शहरातील ट्राफिक समस्या व महामार्गाच्या चौपदरी अंतर्गत प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्याबाबत संबंधित अधिकाºयांसोबत बैठक घेण्यात आली. त्यात ट्राफिक समस्या सोडविण्याबाबत पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांच्यासोबत मी आणि नगसेवकांनी चर्चा केली. ही समस्या मार्गी लावण्यासाठी उपाययोजना देखील करण्याचे ठरले. तसेच महामार्गाच्या चौपदरी अंतर्गत शहरात प्रलंबित असलेली कामे मार्गी लागण्यासाठी संबंधित अधिकाºयांची चर्चा करण्यात आली. चर्चेअंती त्यांनी ही कामे मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे पारकर यांनी सांगितले.