दुचाकी अपघातात दोघे गंभीर जखमी

पत्रकार भगवान लोकेंची जखमींना मोलाची मदत
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 06, 2026 20:24 PM
views 68  views

कणकवली : मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीचा नियंत्रण सुटून अपघात झाला यामध्ये दुचाकीवरील लबिक पटेल (वय 20 , रा. हरकुळ खुर्द , ता. कणकवली ), केतन वाडे ( वय 28 , रा. मुंबई ) हे दोघेही गंभीर जखमी झाले. हा अपघात महामार्गावर हुंबरठ पावणादेवी मंदिरानजीक दुपारी 2.20 वाजताच्या दरम्याने घडला. जखमींना पत्रकार भगवान लोके यांनी आपल्या कारणे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली.