कणकवली नाटळ येथील अनघा सावंत यांचं निधन

Edited by: संदीप देसाई
Published on: April 08, 2026 16:56 PM
views 140  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील मूळ गाव नाटळ (धाकटे मोहुळ) येथील व सध्या कणकवलीतील कणकनगर येथे वास्तव्यास असलेल्या अनघा लक्ष्मण सावंत (वय 65 )यांचे सोमवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या शांत, मनमिळावू स्वभावाच्या होत्या त्यामुळे परिसरात त्यांची ओळख जिव्हाळ्याच्या व्यक्तिमत्त्व म्हणून होती.  त्यांच्या निधनाने नाटळ व कणकनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पती लक्ष्मण सावंत, मुलगा पंकज, मुलगी पल्लवी राणे यांसह नातू, नातवंडे चुलत दीर, भावजया, पुतणे असा मोठा परिवार आहे. बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक लक्ष्मण सावंत यांच्या त्या पत्नी तर कोकणसाद LIVE आणि दैनिक कोकणसादचे मार्केटिंग हेड समीर सावंत यांच्या त्या काकी होत.