उभ्या टेम्पोला ट्रकची समोरुन धडक | चालक जखमी

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 06, 2026 20:16 PM
views 51  views

कणकवली  : मुंबई - मालाड ते गोवा-म्हापसा असा टाटा टेम्पोने मार्बल टाइल्स घेऊन जात असताना चालक मगदूम महम्मद अलीशेख (33, रा.कोलगाव) याने सोमवारी पहाटे 3.15 वा.च्या सुमारास चहा पिण्यासाठी टेम्पो महामार्गावर जानवली-साकेडी फाट्यानजीक डाव्या बाजूला थांबवला होता. अर्ध्या तासाने पुन्हा म्हापसा येथे जाण्यासाठी टेम्पो, चालक सुरु करत असताना अचानकपणे समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने टेम्पोला ड्रायव्हरसाईडने पुढील 'शो'ला धडक दिली. यात चालक मगदूम अलीशेख याला मुका मार लागला व टेम्पोचे मोठे नुकसान झाले. 

2 एप्रिल रोजी टेम्पो चालक मगदूम अलीशेख हे फोंडा-गोवा येथील योगेश प्रभुदेसाई यांच्या मालकीचा टेम्पो घेऊन सावंतवाडी येथून कोकोकोलाच्या रिकाम्या बाटल्या घेऊन मुंबईला गेले होते. रविवार 5 एप्रिल रोजी सायंकाळी 4.30 वा. च्या सुमारास त्याच टेम्पोने मार्बल टाइल्स घेवून मालाड ते म्हापसा जात असताना महामार्गावर जानवली-साकेडी फाटा येथे हा अपघात घडला. टेम्पोला धडक देऊन ट्रकने पोबारा केला. याप्रकरणी मगदूम अलीशेख याच्या तक्रारीवरुन अज्ञात ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.