लक्ष्मी अपराध यांचे निधन

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 05, 2026 19:41 PM
views 45  views

कणकवली : तालुक्यातील बोर्डवे - मधलीवाडी येथील मूळ रहिवासी व सध्या शिवाजीनगर-कणकवली येथे राहणारे स्टेट बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मण सीताराम अपराध यांच्या पत्नी लक्ष्मी लक्ष्मण अपराध (वय ७०) यांचे शुक्रवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, चार मुली, जावई, नातवंडे, दीर, जाऊ, पुतण्या, पुतणी असा  परिवार आहे. वरवडे येथील आयडियल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडेचे शिक्षक हेमंत पाटकर यांच्या त्या सासू होत.