आनंदीबाई हुमरेकर यांचे निधन

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 05, 2026 19:29 PM
views 34  views

कणकवली : फोंडाघाट - विद्यानगर येथील आनंदीबाई अनंत हुमरेकर ( वय १०७) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. फोंडाघाट शमधील कृषी संशोधन केंद्र याठिकाणी आपली प्रदीर्घ सेवा देऊन नंतर मुलगी आणि नातवंडे यांच्या सहवासात जवळपास चार पिढ्यांसोबत राहिलेल्या आनंदीबाई यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगी, मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.