दिनेश राणे यांचा गोपुरी आश्रमातर्फे सत्कार

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय संचालक मंडळावर झालीय नियुक्ती
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 21, 2026 20:28 PM
views 15  views

कणकवली :  मुंबई मराठी ग्रंथ संग्रहलायच्या निवडणुकीत दिनेश  राणे यांची संचालक मंडळावर निवड झाल्याबद्दल गोपुरी आश्रमाच्यावतीने जी. ए. सावंत हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरवाचनालयाचे सहकार्यवाह डी. पी. तानवडे, आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर आदी उपस्थित होते.  दिनेश राणे म्हणाले, महाराष्ट्रातील वाचन संस्कृती टिकली पाहिजे, याकरिता ग्रंथालये, वाचनालये काम करीत आहे. ही संस्कृती टिकविण्याचे काम मराठी माणसाने केले पाहिजे. गोपुरी हे सामाजिक परिवर्तनाचे केंद्र असून गोपुरीने माझा केलेला सत्कार घरच्या मंडळींनी केल्यासारखा आहे. नव्या पिढीला वाचन चळवळी जोडून घेण्यासाठी त्यांना डिजिटल स्वरुपात पुस्तके वाचायला दिली पाहिजेत. कारण पुस्तके ही माणसाला नैतिकता आणि संस्कार शिकवते. त्यामुळे नव्या पिढीने मोबाईल, सोशल मीडियाला आपला मित्र बनविण्यापेक्षा पुरस्तकांना आपला मित्र बनवावा, असे आवाहन त्यांनी केले. 

सूत्रसंचालन विनायक सापळे यांनी केले. आभार राजेंद्र मुंबरकर यांनी मानले. यावेळी गोपुरी आश्रमाचे उपाध्यक्ष व्ही. के. सावंत, सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, सदस्य संदीप सावंत, अर्पिता मुंबरकर, दर्शना पाताडे, पत्रकार तुषार हजारे, आनंद तांबे, नितीन तळेकर, सदाशिव राणे आदी उपस्थित होते.