सत्तेचा योग्य वापर करून घ्या : अमोल लोके

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 21, 2026 20:34 PM
views 13  views

देवगड : गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी केंद्रात भाजप व राज्यात महायुतीची सत्ता असल्याने गावांच्या विकासासाठी ही मोठी संधी असून,या सत्तेचा योग्य वापर तो वापर करून घ्या असे प्रतिपादन देवगड उपसभापती अमोल लोके यांनी फणसे गावाच्या ग्रामपंचायतिच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्या निमित्त बोलताना केले उपसभापती अमोल लोके यांच्या हस्ते यावेळी फणसे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजनाचा कार्यक्रम सपन्न झाला .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार निलेश राणे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत.त्यांच्या माध्यमातून गावपातळीवरीलविकासकामांना गती मिळत आहे.गावातील प्रत्येक ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी सहकार्य करावे असेही सभापती अमोल लोके यांनी सांगितले.देवगड तालुक्यातील फणसे गावच्या ग्रामपंचायत इमारतीसाठी हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधकाम योजनेअंतर्गत सुमारे २० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे.या निधीसाठी देवगड तालुका शिवसेना तालुकाप्रमुख अमोल लोके तसेच युवा सेना तालुकाप्रमुख दिनेश गावकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. सन १९७५ मध्ये स्थापन झालेली फणसे ग्रामपंचायत इमारत कालांतराने जीर्ण झाल्यामुळे नवीन इमारतीची गरज निर्माण झाली होती. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. गतवर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामास मंजुरी दिल्यानंतर आज प्रत्यक्ष भूमिपूजनाचा शुभारंभ करण्यात आला.दरम्यान, उपसभापती अमोल लोके यांचे फणसे गावात आगमन होताच ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतषबाजीसह जल्लोषात स्वागत केले. देवगड पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती म्हणून त्यांचा फणसे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांनी केक कापून आनंदात उत्सव साजरा केला.या वेळी या कार्यक्रम सोहळ्यास ग्रामसेवक डी. व्ही. कांबळे, सरपंच अमित फणसेकर, सदस्य आरती गावकर, योगेश गावकर, विष्णू फणसेकर, दिलीप फणसेकर, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष दिनेश गावकर, सुनील फडके, विजय फडके, पोलीस पाटील राजेश कांबळे, साईनाथ काळे, विनायक नाटेकर, मंगेश तांबे, दिनेश परकर, आराध्या गावकर, जनार्दन पडेलकर, प्रदीप गावकर आदी उपस्थित होते.