कळसुलीत उबाठा शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: February 01, 2026 11:50 AM
views 82  views

कणकवली : कळसुली जि. प. मतदारसंघातील उबाठा शिवसेनेच्या जिल्हा परिषद उमेदवार सौ. प्राची आमडोसकर आणि पंचायत समिती उमेदवार मनोहर मालंडकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच पार पडला. यावेळी कळसुली जि. प., पं. स. तसेच ओसरगांव पं. स. मतदारसंघांवर उबाठा शिवसेनेचा भगवा फडकणार, असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला. यावेळी चंदू परब, नंदकिशोर परब, नरेश दळवी, सुशांत दळवी, मधुकर चव्हाण, संतोष मुरकर, रामकृष्ण परब, संतोष सुतार, शैलेश दळवी, बाबू नार्वेकर, राजेश परब, अनिल दळवी, प्रकाश पाताडे, रोहित राणे, अनंत राणे, रवी परब , अक्षय वायंगणकर आदींसह ग्रामस्थ, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.