अपक्ष उमेदवार सुनीता भिसे यांच्या प्रचाराचा कळणेत शुभारंभ

एकनाथ नाडकर्णी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित
Edited by: लवू परब
Published on: February 01, 2026 12:39 PM
views 57  views

दोडामार्ग : मणेरी जिल्हा परिषद मतदार संघात अपक्ष उमेदवार सुनीता भिसे यांच्या प्रचाराचा कळणे येथील मुळपुरुष मंदिरात श्रीफळ ठेऊन शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी जिप उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते ग्रामस्थ, महिला उपस्थित होते. यावेळी उमेदवार सुनीता भिसे म्हणाल्या की मी निवडून आल्यावर भाजप पक्षातच जाणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मणेरी जि. प मतदार संघात जनतेच्या आग्रा खातीर आणि एकनाथ नाडकर्णी यांच्या शब्दा साठी मी आज अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहे. माजी जिप उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांचा या मतदार संघात व संपूर्ण तालूक्यात जेष्ठ नेते म्हणून ओळख आहे याचाच फायदा आपल्या होणार आहे. आणि या मतदार संघातून मी निवडून आल्यावर भारतीय जनता पक्षातच जाणार असल्याचे भिसे यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांच्या सोबत कळणे सरपंच अजित देसाई, पंचक्रोशीतील ग्रामपंचायत सदस्य महिला, युवा वर्ग, जाणकर आदी उपस्थित होते.