कुणकेश्वर जि. प. मतदारसंघात उबाठा शिवसेनेचे गणेश गावकर - गणेश वाळके यांची प्रचारात आघाडी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 01, 2026 12:12 PM
views 154  views

देवगड : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणकेश्वर जिल्हा परिषद मतदारसंघात उबाठा शिवसेना पक्षाचे उमेदवार गणेश गावकर यांची प्रचारात आघाडी असून त्यांनी जिल्हा परिषद कुणकेश्वर प्रभागातील मतदारसंघात वाडी वस्त्या गावांमध्ये डोअर टू डोअर भेट देऊन प्रचाराला वेग दिला आहे.याला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून कुणकेश्वर जिल्हा परिषद चे गणेश गावकर व पंचायत समितीचे गणेश वाळके दररोज विविध गावांना भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत.येथील गावांमधील विकासकामे, मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, आरोग्य व शिक्षण यासंदर्भातील समस्या ऐकून घेऊन त्या सोडविण्यार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले असून यावेळी त्यांच्या सोबत उबाठा कार्यकर्ते तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.