कासार्डे जिल्हा परिषदचा सर्वांगिण विकास हाच ध्यास : संतोष पारकर

कासार्डे जिल्हापरिषद आदर्श मतदारसंघ बनवणार | गावनिहाय प्रचार बैठकांचा धडाका
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 01, 2026 11:47 AM
views 30  views

कणकवली  : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघ हा नेहमी खा. नारायण राणे यांच्या पाठीशी राहिलेला आहे. या मतदारसंघातील प्रत्येक गावातील नागरिकांचे राणे कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे संबंध आहे. त्यामुळे या मतदारसंघात प्रचार करत असताना मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता आपला विजय निश्चित आहे. या मतदारसंघात पुढील काळात प्रत्येत गावातील सर्वांगिण विकास करण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. सिंधुदुर्गात कासार्डे जिल्हापरिषद मतदारसंघ हा आदर्शवत बनवणार असल्याचे प्रतिपादन कासार्डे जिल्हा परिषद महायुतीचे उमेदवार संतोष पारकर यांनी केले.

आयनल , असलदे , कोळोशी , नांदगाव, तोंडवली - बावशी या नांदगाव पंचायत समिती गावांमधील गाव बैठकांचा सपाटा महायुतीचे उमेदवार संतोष पारकर यांच्या प्रचारार्थ लावण्यात आला आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई , प्रकाश पारकर , सरचिटणीस पंढरी वायंगणकर , माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम , असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , नांदगाव सरपंच भाई मोरजकर,  असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके , भालचंद्र साटम , अण्णा खाडये , समीर शेटये,  रघुनाथ लोके , बाबू फाटक , संतोष वायंगणकर , पांडूरंग चव्हाण , कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, सुशील इंदप, चंदू शिंदे , सुभाष इंदप , आप्पा इंदप , माजी सरपंच श्री. पोकळे, दयानंद हडकर , माजी सरपंच सुरेश लोके, उपसरपंच सचिन परब, प्रविण डगरे, प्रदिप हरमलकर, संतोष घाडी , संतोष परब , उदय परब , बाबू परब , सतीश पोकळे , कमलेश पाटील , मारुती मोर्ये , राजू खोत , राजू तांबे , आबा बिडये , इरफान साटविलकर , यासीन मास्के  ,यासीन पाटणकर , हनुमंत वाळके, निरज मोर्ये , तोंडवली सरपंच मनाली गुरव , अशोक बोभाटे , श्री. शेटये , रवी बोभाटे , सुनील बोभाटे , विलास कांडर , दिनेश कांडर , गणेश पाताडे , महेश लोके, विजय आचरेकर , प्रशांत परब, मनोज लोके , संदेश आचरेकर, प्रकाश आचरेकर , बाबाजी शिंदे , सुभाष तांबे , आत्माराम घाडी , विजय खरात , रुपेश खरात , राजू राणे आदींसह भाजप , शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

संजय देसाई म्हणाले, खा.नारायण राणे , पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या गावांमध्ये विकास कामे मार्गी लागली आहेत. जनतेचा विश्वास महायुतीच्या पाठीशी आहे. त्यामुळे मी जिल्हा परिषद सदस्य असताना केलेली विकासकामे आणि माझे सहकारी म्हणून  सर्वसामान्य लोक जिल्हा परिषदचे उमेदवार संतोष पारकर यांच्या पाठीशी आहेत. पंढरी वायंगणकर म्हणाले , विकासकामे विविध मार्गी लागलेली आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी महायुतीचे उमेदवार संतोष पारकर यांच्या पाठीशी राहूयात. चांगले मताधिक्य मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.

भगवान लोके म्हणाले , ही जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूक खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वात लढली जात आहे. त्यामुळे गाफील राहुन चालणार नाही. याठिकाणी सत्तेच्या माध्यमातून झालेली विकासकामे लोकांपर्यंत पोहचवली पाहिजेत. केंद्रात , राज्यात असलेले सरकार एका विचाराचे आहे. जिल्हापरिषदेत देखील त्याच विचाराचा सदस्य असल्यास थेट विचार आपल्या गावापर्यंत आणि घरापर्यंत पोहोचू शकेल. जरी कुणाचे राजकीयदृष्ट्या मतभेद विसरुन  विकासाच्या मुद्दयावर गावाच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे. भालचंद्र साटम म्हणाले , जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध योजना आहेत. त्या योजना सर्वसामान्यांपर्यत पोहोचवण‌्यासाठी संतोष पारकर हे सक्षम उमेदवार असल्याने एका कर्मचा-यामार्फत या पंचायत समितीमध्ये काम करतील. विविध योजना व विकासकामे झाल्याने नागरिकांनी संतोष पारकर यांना मतदान करावे.

हर्षदा वाळके म्हणाल्या , माझ्यावर खा.नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांनी विश्वासाने पक्षाची जबाबदारी दिली.  मात्र, आपल्या सर्वांच्या आर्शिवादामुळेच पंचायतीतील विरोधी उमेदवारांनी मोठ‌्या मनाने उमेदवारी अर्ज माघे घेत बिनविरोध केले आहे. आता पुढील 5 वर्षे सेवा करण्याची संधी मला मिळालेली आहे. या विविध गाव बैठकांमध्ये बुवा प्रकाश पारकर , सरपंच भाई मोरजकर, चंद्रकांत डामरे , सुशील इंदप, भाग्यलक्ष्मी साटम आदींसह विविध गावांमध्ये मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी विकासकामांवर चर्चा करण्यात आली.