
देवगड : देवगड जामसंडे शहर विकास समन्वय समिती च्या वतीने देवगड जामसंडे नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये देवगड जामसंडेतील नागरिकांनी मिळून 35 लोकांची समिती स्थापन केली असून त्या समिती च्या माध्यमातून देवगड जामसंडे शहरातील विविध अत्यावश्यक कामांचा पाठपुरावा घेणे तसेच चालू असणारे काम दर्जेदार होत आहे की नाही याची पाहणी करणे, तसेच शहराच्या विकास साठी आवश्क असणाऱ्या प्रकल्पाची सुविधांची मागणी करणे व त्याचा पाठ पुरावा करणे हे या समितीचे उदिष्ट आहे.त्यानुसार या समितीने आपल्या कामास सुरुवात केली असून दिनांक 15/01/20२६ रोजी देवगड जामसंडे नगरपंचायत च्या CEO गौरी पाटील यांची भेट घेऊन देवगड जामसंडे पाणी पुरवठा दुरुस्तीच काम सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली तसेच विविध विकास कामांवर चर्चा करून माहिती घेतली
तसेच नवीन नळ पाणी योजनेची माहिती घेऊन तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याची मागणी केली अश्याच प्रकारचे शहराच्या विकासासाठी आवश्यक असणारे विविध विषय या समिती च्या माध्यमातून हाताळले जाणार असल्याचे यावेळी त्यांच्या कडून सांगण्यात आले आहे.या संदर्भात देवगड जामसंडेतील नागरिकांनी मिळून 17 प्रभागातून 35 लोकांची मिळून ही देवगड जामसंडे शहर विकास समन्वय समितीची स्थापन करण्यात आली आहे. या बाबत देवगड जामसंडे शहर विकास समन्वय समिती च्या वतीने देवगड जामसंडे, नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.यावेळी गुरुदेव परुळेकर,तुकाराम खवळे, चारुदत्त सोमण,शामल जोशी,आश्विनी मोहिते, अविनाश माहिते,सचिन दहिबावकर,शंकर तारकर, जयप्रकाश प्रभु,शेखर सावंत, राजेद्र राणे,सुधिर मांजरेकर, नारायण मोहिते,सुधीर बापट, योगेश गोळम,राजेंद्र पाटील, शरद आदम, संदीप साटम मुणगेकर,विष्णू धुरत,प्रदीप सावंत,नंदुकुमार परब, ओमकार बांदकर ,राजेंद्र मेस्त्री, दिनेश पोसम,स्वप्नील कुबल, प्रफुल्ल कणेरकर,प्रितेश डोंगरे, प्रकाश सावंत,योगेश पाठक, अनिल खडपकर आदी देवगड जामसंडे शहर विकास समन्वय समिती चे सदस्य यावेळी उपस्थित होते.










