
कणकवली : कणकवलीत प्रभाग क्रमांक १० च्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आर्या औदुंबर राणे यांनी आपल्या नवीन वर्षाची सुरवात स्वच्छ कणकवली सुंदर कणकवली या नाऱ्याने केली आहे. प्रभाग 10 मधील मसुरकर किनई रोडच्या दुतर्फा उगवलेले गवत आणि गटार सफाई करण्याची मागणी स्थानिक जनतेतून होत होती. जनतेच्या मागणीची तात्काळ दखल घेत नगरसेविका आर्या राणे यांनी नगरपंचायत प्रशासनाला तात्काळ सूचना देत मसुरकर किनई सफाईच्या सूचना केल्या. नगरसेविका आर्या राणे यांनी स्वतः उपस्थित राहून मसुरकर किनई रोडलगत उगवलेले गवत कर्मचाऱ्यांकडून ग्रास कटरने कापून घेतले. तसेच गटारातील कचरा सफाई करून घेत मसुरकर किनई रोड परिसर स्वच्छ केला. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.










