
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघातर्फे गणपती सान्या नजीक असलेल्या चौंडेश्वरी मंदिरात रविवार २८ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत श्री देवी चौंडेश्वरीचा शकांभरी उत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. २८ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत दररोज सकाळी ९ वा. कुंकूमार्जन पूजाविधी, सायंकाळी ७.३० आरती होईल. शनिवार ३ जानेवारी रोजी सकाळी १० वा. श्री सत्यंबा देवीची महापूजा, तीर्थप्रसाद, दुपारी १२ वा. आरती, १ वा. महाप्रसाद, ३ ते सायंकाळी ६ यावेळेत हळदीकुंकू समारंभ होईल. तरी या उत्सवात समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघातर्फे करण्यात आले आहे.










