
कणकवली : वसंतराव आचेरकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली यांच्यामार्फत बॅ. नाथ पै राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा कणकवली येथे २५ ते दि. २७ डिसेंबर या कालावधीत पार पडली. या स्पर्धेमध्ये एस. एम. प्राथमिक विभाग, कणकवली यांच्या 'पांडूरंग : नागू आणि सावतोबाचा' या एकांकिकेने शालेय गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. याबाबत हायस्कूलच्या संस्थेतर्फे सर्व सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धेमध्ये प्रशालेतील पालक प्रसाद लाड यांनी दिग्दर्शन - प्रथम क्रमांक) व तांत्रिक अंग - तृतीय क्रमांक, नील जोशी याने पुरुष अभिनयात द्वितीय क्रमांक मिळविला. यशाबद्दल सर्व बाल कलाकारांचे, एकांकिका सादरीकरणास परीश्रम घेणा-या शिक्षक वर्गाचे कणकवली शिक्षण संस्था, कणकवलीचे डॉ. संदिप सावंत ( चेअरमन ), डी. एम. नलावडे (सचिव) डॉ. एस. एन. तायशेटे, एम. ए. काणेकर (उपचेअरमन) व सर्व संस्था पदाधिकारी, श्रीमती. दिव्या बाणे (मुख्याध्यापिका, एस. एम. प्राथमिक विभाग, कणकवली) तसेच या संस्थेच्या सर्व विभागातील शिक्षक - शिक्षकेतर वर्गाने अभिनंदन केले आहे.










