जानवली बौद्धविहारला २२ ला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 20, 2025 17:43 PM
views 60  views

कणकवली : तालुक्‍यातील जानवली येथील बुद्ध विहारच्या सभागृहात शुक्रवार २२ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण दिले जाणार आहे. राष्‍ट्रीय आपत्ती दलाचे सिंधुदुर्ग टीम कमांडर आ.जे. यादव हे यावेळी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षणाला सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळ अधिकारी योजना सापळे आणि ग्राम महसूल अधिकारी दत्ता डाके त्यांनी केले आहे.

या प्रशिक्षणामध्ये आपत्तकालीन परिस्थितीमध्ये जोखीम कमी करणे. आपत्‌कालीन परिस्थितीशी लढण्यासाठीची पूर्वतयाारी, मदत आणि बचाव कार्य कसे करावे. बाधित लोकांनाम दत आणि जनजीवन पूवर्वत करण्यासाठीचे प्रयत्‍न, जखमींना प्रथमोपचार, आपत्ती व्यवस्थापनात सक्रीय सहभाग आदींबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्‍याची माहिती मंडळ अधिकारी योजना सापळे यांनी दिली.