
कणकवली : जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कणकवली तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचा विषय आपला कोकण हा आहे. या स्पर्धेकरिता अनुक्रमे स्मार्ट वॉच, ब्ल्यूटूथ स्पिकर बार, ईयरफोन व सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, दोन उत्तेजनार्थ अशी बक्षीसे असून सहभागी स्पर्धकाला सन्मानपत्र दिले जाणार आहे. स्पर्धकाने मोबाईलने काढलेला फोटो १५ आॅगस्टपर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत (९८९०३१३२१२) या व्हॉट्सअॅपनंबरवर डॉक्युमेंट फॉरमेंटमध्ये पाठवावा. स्पर्धकाने पाठवलेला फोटो १९ आॅगस्ट रोजी असोसिएशनने कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल येथे आयोजित केलेल्या प्रदर्शनात लावण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.