
कणकवली : शहरातील काशीविश्वेश्वर मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. शुक्रवारी रात्री महापुरुष मित्रमंडळाने 'बगळारुपी बकासुराचा वध 'हा काढलेला चलचित्ररथ देखावा लक्षवेधी ठरला.
काशीविश्वेश्वर मंदिरात गुरुवारपासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला.यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेले दोन दिवस विविध मंडळांनी दिंडी व चित्ररथ देखावे काढले. शुक्रवारी महापुरुष मित्रमंडळाने ढोल-तशांच्या गजरात काढलेला 'बगळ्यारुपी बकासुराचा वध' हा चलचित्ररथ देखावा लक्षवेधी ठरला. बाळकृष्णाला गिळंगृत केलेल्या बकासुर रुपी बगळ्याचा वध बाळकृष्ण करतो, यावर हा देखावा होता. या देखाव्याची पटवर्धन चौक ते काशीविश्वेश्वर मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आला. देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.