
कणकवली : कलमठ - बिडयेवाडी येथे शनिवारी स्वच्छता जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी कलमठ उपसरपंच दिनेश गोठणकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, महेश लाड, ग्रामपंचायत सदस्य पप्पू यादव, प्रीती मेस्त्री, तनिष्का लोकरे, अनुप वारंग, सचिन खोचरे, श्रेयश चिंदरकर, संजय गुरव, बाबू नारकर, संजय गुरव, संतोष मेस्त्री, भूषण पवार, नितेश मेस्त्री, प्रणय शिर्के, तेजस लोकरे, समीर रजपूत, ऋत्विज राणे आदी उपस्थित होते.