रिक्षा संघटनेतर्फे खारेपाटण बसस्थानक आवारात वृक्षारोपण

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: July 28, 2025 11:15 AM
views 184  views

कणकवली : खारेपाटण रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने खारेपाटण एसटी स्टँडच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. विशेषतः फुलझाडांचे‌ रोपण करण्यात आले. याप्रसंगी डेपो कंट्रोल सुशील सावंत, रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष संतोष दत्ताराम तूरळकर, शरीफ काझी, सुरेंद्र चिके ,सोमेश्वर पिसे, मोहन पगारे, राजू चव्हाण इतर रिक्षा संघटनेचे सभासद लक्ष्मण गुरव ,संदीप राऊत ,प्रमोद आंगवलकर, महेश बांदिवडेकर, हरेश पगारे, शिवाजी राऊत, रुपेश शिंदे, संतोष पांचाळ, महेश राऊत, रऊफ पटेल, राजा राऊत, आयफ आदी उपस्थित होते.