
कणकवली : कणकवली तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीचे आराध्य दैवत स्वयंभू चरणी शिव महीन्म: अभिषेक करण्यात आला. उद्धव ठाकरेंना उदंड व निरोगी आयुष्य लाभुदे, ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होउदे, अशी प्रार्थना शिवसैनिकांनी केली. यावेळी कणकवली उपजिल्हा रुग्णायलातील रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख संदीप कदम, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, राजू राठोड, राजू राणे, विलास गुडेकर, धीरज मेस्त्री, तेजस राणे, गुरुनाथ पेडणेकर, रुपेश आमडोस्कर, संतोष सावंत, सचिन आमडोस्कर, अनिल जाधव, आशिष मेस्त्री, महेश राणे, रवि भंडारे, उद्धव पारकर, लक्ष्मण हन्नीकोड, बाबु केणी, मिलिंद आईर, माधवी दळवी, संजना कोलते, रोहिणी पिळणकर, वैदेही गुडेकर आदी महिला, शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.