
कणकवली : कलमठ गाव स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी ग्रामपंचायतीने कंबर कसली आहे. १ आॅगस्टपासून सार्वजनिक ठिकाणी व नदीपात्रात कचरा टाकताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नदीपात्रात कचरा टाकणाºया व्यक्तीचे जो कोणी नाव सांगेल त्याचे नाव गुपीत ठेवून त्याला बक्षीस म्हणून ५०० रुपये बक्षीस ग्रा.पं.कडून दिले जाणार आहे.
स्वच्छ व सुंदर कलमठ गाव अभियाना अंतर्गत १ आॅगस्टपासून घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी येणाºया सफाई कर्मचाºयाकडे ओला कचरा द्यायला आणि आठवडयातून १ दिवस म्हणजे गुरुवारी घरातील सुका कचरा त्या सफाई कामचाºयाजवळ द्यावा. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाºयावर २,००० रुपयांचे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नदीपात्रात कचरा टाकणाºयांना २,००० रुपयांचे दंड आकारण्यात येणार आहे. नदी पात्रात कचरा टाकणाऱ्या व्यक्तीचे नाव जो कोणी सांगेल त्या व्यक्तीचे नाव गुपीत ठेवून त्याला बक्षीस म्हणून ५०० रुपये देण्यात येणार आहे. कलमठ गाव स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी ग्रा.पं.ने केलेल्या उपाययोजनांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच संदीप मेस्त्री व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.