
कणकवली : ज्ञानवर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट, तळेरे यांच्यामार्फत तळेरे विद्यालय पार पडलेल्या जिल्हास्तरीय आंतर कनिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये फोंडाघाट येथील न्यू इंग्लिश स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
निबंध स्पर्धेत नम्रता हुंबे हिने प्रथम तर अनिशा चौहान, अनुजा पाटील यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावले. वक्तृत्व स्पर्धेत शितल गुरखे हिने प्रथम तर खुशी सावंत, श्रद्धा लाड यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविले. रांगोळी स्पर्धेच्या सांघिक प्रकारात दिव्या नानचे, वेदिका सुतार यांनी द्वितीय, रेणुका मुणगेकर, शर्वरी शेळके यांच्या संघाने तृतीय, तर चैताली कदम, जान्हवी पाटील यांच्या संघाने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राध्यापक एस. आर.जोईल, एस.व्ही.सावंत, डी.बी.फड, एम.के. नारिंगकर, ए. एल. वाळवे यांचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन म.ज. सावंत, सेक्रेटरी चं. शा. लिंग्रस, खजिनदार वि. रा. तायशेटे, शाळा समिती चेअरमन द. दि. पवार, मुख्याध्यापक पी. के. पारकर, व्ही.पी.राठोड आदींनी अभिनंदन केले.










