
कणकवली : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नगर वाचनालयातर्फे रविवार २८ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० यावेळेत वाचनालयाच्या आप्पासाहेब पटवर्धन सभागृहात संस्कृत व्याकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत पुणे येथील प्रख्यात संस्कृत शिक्षिका आरती पवार मार्गदर्शन करणार आहेत.
ही कार्यशाळा संस्कृत (संपूर्ण) अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. कार्यशाळा २०० विद्यार्थ्यांपुरती मर्यादित असल्याने प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. कार्यशाळेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगर वाचनालयाचे अध्यक्ष तथा पालकमंत्री नितेश राणे व कार्यवाह हनीफ पीरखान यांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी विद्यार्थी व पालकांनी ग्रंथपाल राजन ठाकूर यांच्याशी संपर्क साधावा.










