
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने २०२५ साठी संत सेवा पुरस्कार, ज्येष्ठ वारकरी पुरस्कार, ज्येष्ठ कीर्तनकार पुरस्कार तसेच ज्येष्ठ मृदूंगमणी पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. वय वर्ष ६५ पूर्ण असलेल्या उमेदवारांना ज्येष्ठ कीर्तनकार व ज्येष्ठ मृदूंगमणी पुरस्कार दिले जाणार असून, वय वर्ष ८० पूर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी ज्येष्ठ वारकरी पुरस्कार देण्यात येणार आहे. अर्जदार हा जिल्हा वारकरी संप्रदायाचा सभासद असणे आवश्यक आहे. इच्छुकांनी १८ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करावेत. पत्रव्यवहारासाठी मधुकर प्रभूगावकर, साई श्रद्धा निवास, जळकेवाडी, कणकवली इथे अर्ज पाठवावेत. अधिक माहितीसाठी विश्वनाथ कृष्णा गवंडळकर (मो. 9420261934) व गणपत विश्राम घाडीगावकर (मो. 9623884116) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.










