
कणकवली : नगरपंचायत निवडणूक मतदान दोन डिसेंबरला पार पडले. यानंतर या मतपेट्या कणकवली तहसील कार्यालयामधील सीसीटीव्हीच्या नजर कैदेत ठेवण्यात आल्या असून, स्ट्राँगरूमच्या बाहेर कडेकोड पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून आलेल्या परिपत्रकामध्ये उमेदवारांना आपले प्रतिनिधी या ठिकाणी ठेवायचे असेल तर ते ठेवू शकतात असे सांगण्यात आल्यानंतर कणकवली शहर विकास आघाडीच्या नेत्यांकडून स्ट्राँगरूमच्या बाहेर एक व्यक्ती ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शहर विकास आघाडीकडून ईव्हीएम स्ट्राँगरूमच्या बाहेर दिवस रात्र पहारा असल्याचे दिसून येत आहे,










