कणकवलीत संत जगनाडे महाराज जयंती साजरी

Edited by: उमेश बुचडे
Published on: December 08, 2025 16:22 PM
views 185  views

कणकवली : कणकवलीत संत जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कणकवली तेलीआळी येथे संत जगनाडे महाराज यांची आरती करण्यात आली. यावेळी डॉ. सिद्दि नेरकर आणि विशाल नेरकर यांना पूजेचा मान मिळाला. तसेच जगनाडे त्यांच्या जीवनावर आधारित दिनदर्शिका देखील प्रकाशित करण्यात आली. यामध्ये त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या समाजकार्याचा उजाळा देखील उपस्थितांकडून देण्यात आला. यावेळी कणकवली तेली समाज तालुकाध्यक्ष महेश उर्फ बाळा डिचोलकर, सचिव विशाल नेरकर, सहसचिव सिद्धेश प्रकाश वालावलकर, आशिष वालावलकर, उत्कर्ष डिचोलकर, दत्ताराम हळदणकर, नंदू आरोलकर, प्रकाश काळसेकर, सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण तेली, परशुराम झगडे, नितीन कुवळेकर, गार्गी कसालकर, अंकिता मुळदेकर, यश नेरकर आदी उपस्थित होते.