
कणकवली : कणकवलीत दिव्यांग बांधवांनी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची भेट घेतली. यावेळी नोव्हेंबरची थकीत पेन्शन व अंत्योदय योजनेसंदर्भात आपली कैफियत मांडली. यावेळी दिव्यंग बांधवांनी UID, आधार, हयात दाखले, उत्पन्न दाखले उपडेट करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच ज्यांची कागदपत्रे जमा आहेत, त्यांचासंदर्भात वरिष्ठ अधीकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. अपडेट आहेत त्यांची या आठवड्यात पेन्शन जाम होईल असे आश्वासन तहसीलदार देशपांडे यांनी दिलं.










