प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती करावी

पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचे आवाहन | गोपुरीत कावी आर्टस् प्रशिक्षणाला प्रतिसाद
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: December 08, 2025 12:01 PM
views 118  views

कणकवली :  प्लास्टिकमुळे निसर्ग व पर्यावरणाची हानी होत आहे. ही हानी रोखण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे काळाजी गरज आहे. प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. निसर्ग व पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी निसर्ग सहलींमध्ये सहभागी होऊन निसर्ग व पर्यावरणाचा अभ्यास करावा, असे आवाहन गोव्यातील पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी केले. 

गोपुरी आश्रमाच्या जीवन शिक्षण उपक्रमाअंतर्गत आश्रमाच्या चिकूच्या बागेत कावी आर्टस् प्रशिक्षण आयोजित केले होते. याप्रसंगी श्री. केरकर बोलत होते. यावेळी पौर्णिमा केरकर, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष  प्रा. राजेंद्र मुंबरकर, सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, चित्रकार नामनंद मोडकर, वामन पंडित, प्रा. बाळकृष्ण गावडे, संदीप सावंत, विनायक सापळे, धीरज मेस्त्री, अर्पिता मुंबरकर, दर्शना पाताडे, सदाशिव राणे, नितीन तळेकर, समृद्धी केरकर, सुरेखा वरडेकर, सनीश अवखळे, वेदांत केरकर, श्रेयश शिंदे, सहदेव पाटकर आदी उपस्थित होते. 

केरकर म्हणाले, गोव्यातील निसर्ग व पर्यावरणाचा ºहास सुरु झाल्यानंतर गोव्यातील पर्यावरणप्रेमींनी हा ºहास रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहे. निसर्ग व पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी विद्यार्थ्यांच्या मदतीने विविध उपक्रम राबवत सरकारचे लक्ष वेधले आहे. निसर्ग व पर्यावरणाचा ºहास होत राहिल्या पृथ्वीवरील सजीवांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. निसर्ग व पर्यावरणाचा अभ्यास करून खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निसर्ग सहलींमध्ये सहभागी झाले पाहिजे. गोपुरी आश्रम हा परिसर निसर्ग संपन्न भाग आहे. कणकवलीतील विद्यार्थ्यांनी या परिसराला भेट देऊन निसर्ग व पर्यावरणाचा अभ्यास करावा, असे आवाहन करताना कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांनी गोपुरी वसवली. त्यांनी गोपुरी हे सामाजिक परिवर्तन घडविणारे केंद्र बनवले. गोपुरीला असलेला वारसा पुढे नेण्याचे काम तरुण पिढीने करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शालेय विद्यार्थ्यांनी कोणतीही कला अवगत करून त्यामध्ये पारंगत झाले पाहिजे. 

गोपुरी आश्रमाच्या कावी आर्टस् कार्यशाळेमुळे भविष्यात निसर्ग व पर्यावरण  संरक्षणकरणारे कलाकार घडतील, असा विश्वास पौर्णिमा केरकर यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन व आभार विनायक सापळे यांनी केले. दरम्यान, कणकवलीतील विद्यार्थ्यांसाठी गोव्यात निसर्ग दर्शन सहल काढली जाणार आहे. यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गोपुरी आश्रमातर्फे करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी रेखाटली कावी चित्रे 

गोपुरी आश्रमातर्फे आयोजित केलेल्या कावी आर्टस् प्रशिक्षणात १०० हून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात विद्यार्थ्यांनी मातीच्या कलरपासून कावी चित्र रेखाटली. ही चित्रे कशी रेखाटावीत, याबाबत समृद्धी केरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कावी चित्रकलेचा इतिहास समृद्धी केरकर यांनी विद्यार्थ्यांना समजून सांगितला.